Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > अमेरिकेतील सर्वात मोठ्या बँकेविरुद्ध कर्मचाऱ्यांचे बंडाचे निशाण; युनियन बनवण्याच्या हालचाली

अमेरिकेतील सर्वात मोठ्या बँकेविरुद्ध कर्मचाऱ्यांचे बंडाचे निशाण; युनियन बनवण्याच्या हालचाली

JP Morgan Employee petition : अमेरिकेतील सर्वात मोठ्या बँकेच्या कर्मचाऱ्यांनी सीईओ जेमी डायमन यांच्या निर्णयविरोधात बंडाचे निशाण उगारले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 17:09 IST2026-02-12T15:47:03+5:302026-02-12T17:09:05+5:30

JP Morgan Employee petition : अमेरिकेतील सर्वात मोठ्या बँकेच्या कर्मचाऱ्यांनी सीईओ जेमी डायमन यांच्या निर्णयविरोधात बंडाचे निशाण उगारले आहे.

JPMorgan RTO Controversy Employees Rebel Against 5-Day Office Mandate | अमेरिकेतील सर्वात मोठ्या बँकेविरुद्ध कर्मचाऱ्यांचे बंडाचे निशाण; युनियन बनवण्याच्या हालचाली

अमेरिकेतील सर्वात मोठ्या बँकेविरुद्ध कर्मचाऱ्यांचे बंडाचे निशाण; युनियन बनवण्याच्या हालचाली

JP Morgan Employee petition : कोरोनानंतर जागतिक स्तरावर रुजलेले 'वर्क फ्रॉम होम' कल्चर आता इतिहास जमा होण्याच्या मार्गावर आहे. अमेरिकेतील सर्वात मोठी बँक जेपीमॉर्गन चेसमध्ये सध्या व्यवस्थापन आणि कर्मचारी यांच्यात 'ऑफिस'वरून जुंपली आहे. बँकेचे सीईओ जेमी डायमन यांनी कर्मचाऱ्यांना आठवड्यातून पाचही दिवस ऑफिसला येण्याचे फर्मान सोडले असून, या निर्णयाविरोधात कर्मचाऱ्यांनी आता याचिका आणि युनियन बनवण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

'हायब्रीड' मॉडेल संपवण्याला कडाडून विरोध
मार्चपासून लागू झालेल्या या नवीन नियमाचा सर्वाधिक फटका त्या ३०% कर्मचाऱ्यांना बसला आहे, जे आतापर्यंत घरून काम करत होते. 'द फायनान्शिअल टाइम्स'च्या रिपोर्टनुसार, कर्मचाऱ्यांनी एका याचिकेद्वारे आपली नाराजी व्यक्त केली आहे. ३ लाखांहून अधिक कर्मचारी असलेल्या या बँकेत आतापर्यंत २,००० हून अधिक जणांनी या निर्णयाविरोधात स्वाक्षऱ्या केल्या आहेत. काही कर्मचाऱ्यांनी थेट 'कम्युनिकेशन्स वर्कर्स ऑफ अमेरिका' या संघटनेशी संपर्क साधून 'लेबर युनियन' स्थापन करण्याबाबत सल्ला मागितला आहे, जे अमेरिकेच्या वित्त क्षेत्रात अत्यंत दुर्मिळ मानले जाते.

कर्मचाऱ्यांचे गाऱ्हाणे काय?
याचिकेवर नाव टाकणे म्हणजे 'करियर सुसाइड' (करियर संपवणे) ठरू शकते, अशी भीती एका कर्मचाऱ्याने व्यक्त केली आहे. कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की. "माझी टीम दोन खंड आणि तीन वेगवेगळ्या टाइम झोनमध्ये विभागलेली आहे. मग सर्वांनी एकाच ऑफिसमध्ये एकत्र बसणे का अनिवार्य आहे?" जेपीमॉर्गन ही एक जागतिक कंपनी आहे, मग कर्मचाऱ्यांचे घर हे त्यांचे कार्यालय का असू शकत नाही?

जेमी डायमन यांचा सडेतोड पवित्रा
टाउन हॉल मीटिंगमध्ये बोलताना सीईओ जेमी डायमन यांनी या याचिकेची दखल घेण्यास स्पष्ट नकार दिला. त्यांनी कर्मचाऱ्यांना दोन पर्याय दिले.
कार्यक्षमता वाढवा : कंपनीत काम करायचे असेल तर उत्पादकता महत्त्वाची आहे.
निवड तुमची : "कंपनीमध्ये काम करायचे की नाही, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे," असे म्हणत त्यांनी कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्याची तयारीही दर्शवली.

सीईओंचा तर्क काय? 
डायमन यांच्या मते, युवा कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, व्यवस्थापन आणि नवीन कल्पनांच्या देवाणघेवाणीसाठी ऑफिसमध्ये प्रत्यक्ष उपस्थित असणे आवश्यक आहे. जरी १०% नोकऱ्या पूर्णपणे रिमोट असल्या, तरी उर्वरित कर्मचाऱ्यांसाठी 'फेस-टू-फेस' संवाद गरजेचा आहे.

वाचा - देशातील टॉप ५ कंपन्यांच्या यादीतून टाटांची सर्वात मौल्यवान कंपनी बाहेर; नेमकं काय घडलं?

बदलत्या वर्क कल्चरचा संघर्ष
जेपीमॉर्गन मधील हा वाद केवळ एका बँकेचा नसून संपूर्ण कॉर्पोरेट जगाचे प्रतिनिधित्व करतो. एका बाजूला लवचिकता हवी असलेले कर्मचारी आहेत, तर दुसरीकडे शिस्त आणि उत्पादकता हवी असलेले व्यवस्थापन. या संघर्षात कोणते 'मॉडेल' जिंकणार, याकडे आता जगाचे लक्ष लागले आहे.
 

Web Title : जेपी मॉर्गन में कर्मचारियों का विद्रोह, यूनियन बनाने की तैयारी।

Web Summary : जेपी मॉर्गन के कर्मचारियों ने सीईओ जेमी डायमन के ऑफिस लौटने के आदेश का विरोध किया है। उत्पादकता और लचीलेपन संबंधी चिंताओं के कारण उन्होंने याचिकाएं दायर की हैं और यूनियन बनाने की संभावनाएं तलाशी हैं।

Web Title : JP Morgan employees rebel against back-to-office mandate, seek union.

Web Summary : JP Morgan employees are protesting CEO Jamie Dimon's order to return to the office full-time. They've signed petitions and explored unionizing due to concerns about productivity and flexibility, challenging the bank's return-to-office policy.